औद्योगिक सुरक्षा विभागाची कार्ये

  • परवाना देणे / परवाने जारी करणे
  • कारखान्यांचे निरीक्षण करणे
  • कारखान्यातील अपघातांची चौकशी करणे
  • तक्रारींची चौकशी करणे व त्यांचे निराकरण करणे
  • सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून मा. न्यायालात कारखाने अधिनियम,1948 अंतर्गत दाखल केलेले खटले चालविणे.
  • जिल्हयाचा बाहय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मदत करणे .
  • रासायनिक अपघात (आपत्कालिन नियोजन, सुसज्जता व प्रतिसाद) नियम,1996 अंतर्गत तयार केलेल्या संकट गटाचे मानद सचिव म्हणून कामकाज पहाणे.
  • सक्षम व्यक्तींना मान्यता देणे.
  • कल्याण अधिका-यांची नोंदणी करणे.
  • उप संचालक (आरोग्य) कारखान्यांचे निरीक्षण करतात,
  • कामाचे ठिकाणाच्या वातावरणाचे निरिक्षण, आरोग्यविषयक सर्वेक्षणे जसे की, ध्वनीची तीव्रता, वायुविजन, हवा ई.
  • वयाची पडताळणी, कारखाने अधिनियमांतर्गत अल्पवयीन व्यक्तीची तपासणी व प्रमाणन,
  • धोकादायक प्रक्रियामध्ये काम करणा-या कामगारांची आरोग्य तपासणी,
  • प्रमाणक शल्यचिकीत्सकाची प्राधिकृती देणे
  • प्रथमोपचार प्रशिक्षण संस्थाना मान्यता देणे.