उद्दीष्टे

  • कारखाने अधिनियम,1948, महाराष्ट्र कारखाने नियम, 1963 व त्याअंतर्गतच्या नियमांची अंमलबजावणी करणे आणि त्या खालील नियमांनुसार कामगारांची सुरक्षा, आरोग्य व कल्याण याबाबत खात्री करणे.
  • कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि तक्रारीचे निवारण याची हमी देणे.
  • कारखान्यातील मोठे अपघात टाळणे. त्याचप्रमाणे कायमस्वरुपी किंवा तात्पुरते अपंगत्व येणारे अपघात टाळणे.
  • औद्योगिक संघटना व सामाजिक संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण शिबीर, कार्यशाळा इ. चे आयोजन करुन कारखाना व्यवस्थापन तसेच कामगारांमध्ये व्यावसायिक आरोग्य व सुरक्षाविषयक जागृती वाढवणे.
  • या संचालनालयामार्फत कारखानदारांना आवश्यक ऑनलाईन सुविधा देणे
  • उपलबध्द माहिती अद्यायावत करुन त्याचे संगणीकरण करुन प्रशासनात पारदर्शकता आणून तातडीने सेवा/सुविधा देणे
  • संचालनालयातील अधिका-यांना वेळोवेळी आवश्यक प्रशिक्षण देणे जेणेकरुन अपघाताच्या संख्यमध्ये घट होण्यास मदत होईल.
  • परस्पर सहाय्यता गट (MARG) यांना प्रोत्साहन देणे.
  • कामगारांचे हात हे या देशाची संपत्ती आहे व ती कुठल्याही परिस्थितीत गमावू शकत नाही असे आम्ही मानतो.
  • विविध कारखान्यात काम करणा-या सुरक्षा विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांचे नियमित व सजगतेपणामुळे आणि त्यातील माहितीचे पृथ:करण करुन शुन्य अपघाताचे ध्येय गाठण्यासाठी मदत करणे