आमचा दृष्टीकोन

कारखान्यातील कामगारांची सुरक्षा कल्याण व आरोग्य हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. म्हणूनच कामाचे ठिकाणी होणारे संभाव्या अपघात व संभाव्या आरोग्याचे धोकेविचारात घेऊन ते समाधानकारकरित्या कमी करणे यासाठी हे संचालनालय बचनबध्द आहे. यामुळे कारखान्यांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल.


आमचा लक्ष्य

अठराव्या शतकाच्या शेवटीमहाराष्ट्रामध्ये कै. महात्मा ज्योतिराव फुले व कै. नारायण मेघाजी लोखंडे या दोन महान दृष्टीकोन असणा-या नेत्यांच्या नेतृत्वाखाली कामगार चळवळीसुरुवात झाली. कामगार कायदे हे सामाजिक सुरक्षेचा भाग असून आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (I. L.O.) यांचेकडून वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे अनुसरण या विभागामार्फत केले जाते.